|| या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा।।

स.वा. जोशी विद्यालयाबद्दल

१९३२ च्या सुमारास श्री यु.पी.वैद्य यांच्या नियुक्तीने पहिली ते तिसरी च्या वर्गांना सुरुवात करुन जून १९३५ पासून ज.ए. इ. दादर या शैक्षणिक संस्थेच्या देखरेखीखाली श्री कृ. ह. नित्सुरे यांच्या अध्यापनाने इयत्ता चौथी सुरू झाली. ६ फेब्रू.१९३७ रोजी ही शाळा एक स्वतंत्र इंग्रजी शाळा सुरु करुन दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट या ५० वर्षे अव्याहतपणे आणि उत्तम शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्थेस चालविण्याकरिता विनंती करण्यात केली व १९४१सालामध्ये भारतरत्न महर्षि धोंडो केशव कर्वे ह्यांच्या हस्ते शाळेचा कोनशीला समारंभ झाला. नंतर कै. अनंत सखाराम जोशी यांनी त्यांचे वडील कै. बाबासाहेब जोशी यांच्या स्मरणार्थ शाळागृह बांधून देण्याच्या त्यांच्या संकल्पास अनुसरून प्रयत्न केले आणि त्यातूनच 'स.वा.जोशी' उदयास आली.


Gallery

गॅलरी


Pride Of S.V.Joshi

आमचे मानबिंदू


Why select S.V. Joshi High School?

स. वा. जोशी विद्यालयच का ?

शैक्षणिक क्षेत्रात एक विशिष्ट ध्येय उद्दिष्ट ठेवून एक छोटसं बीज १ मे १९३७ रोजी डोंबिवली शहरात रोवले गेले. पाहता पाहता रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव पार करून शताब्दी कडे वाटचाल होत आहे.

भौतिक सुविधा
- इयत्ता १ली ते १०वी वर्गाकरिता ई-लर्निंग द्वारे शिक्षण.
- हवेशीर व प्रशस्त वर्ग.
- सुसज्ज परिपूर्ण अत्याधुनिक नवीन प्रयोगशाळा.
- सुसज्ज संगणक कक्ष.
- समृद्ध आणि भव्य ग्रंथालय व वाचनालय.
शैक्षणिक सुविधा
- इयत्ता १०वी साठी विविध विषयांकरिता तज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने आयोजित केली जातात.
- विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती परीक्षा, एम्.टी.एस् व टी.एम.व्हि. भाभा बालवैज्ञानिक परीक्षा, गणित अध्यापक मंडळ इत्यादी स्पर्धा परीक्षांचे शाळेतच उत्तम मार्गदर्शन वर्ग.
-तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील सर्व प्रकारच्या स्पर्धेत भाग घेण्यास विशेष संधी.
- विविध कार्यशाळांचे आयोजन.
- इयत्ता पहिली ते दहावी करिता सेमी इंग्रजीचे वर्ग.
- इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकरीता गुणवर्धिनी योजना व निकाल वृद्धीसाठी विशेष प्रयत्न.
- ऑनलाइन शिक्षणाची सोय.
- कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य (आय.टी सह) व विज्ञानाचे वर्ग (आय.टी व बायफोकल सह (संगणकशास्त्र सी.एस्)) तसेच करियर गायडन्स.
कला क्रीडा सुविधा
- चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट चे वर्ग.
- सर्व क्रीडा साहित्यसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व बाह्य खेळांच्या स्पर्धांमध्ये समावेश एन.सी.सी व स्काऊट गाईड यासाठी विद्यार्थ्यांचा समावेश.
- उत्तम प्रशिक्षित शिक्षक.
- विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य मैदान.
- ज्युडोकराटे, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो इत्यादीचे प्रशिक्षण. क्रिकेट करिता नेट सह मुले व मुलींसाठी खास प्रशिक्षण. (भारतीय संघातील क्रिकेटर अजिंक्य राहणे व निलेश कुलकर्णी याच शाळेचे माजी विद्यार्थी)
माजी विद्यार्थी
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील शाळेचे नामवंत माजी विद्यार्थी आय.पी.एस्. अधिकारी अभिजीत सप्तर्षी, गायिका सुखदा भावे, गीतकार प्रविण दवणे, पत्रकार सुधीर जोगळेकर, पत्रकार श्रीराम शिधये, अर्थतज्ञ श्री चंद्रशेखर टिळक, प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू श्रीमती मेघा कापरेकर-डांगे, नामवंत कलाकार, डॉक्टर, वकील, आमदार, खासदार मंत्री, नगरसेवक, क्रिकेटवीर सुप्रसिद्ध अनमोल रत्नांनी आपले शालेय शिक्षण स.वा. जोशी विद्यालयातच पूर्ण केले.

Testimonials

प्रशंसापत्र


This page was viewed

11471

Times