लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्या पासून प्रेरणा घेऊन समाज उन्नतीसाठी शिक्षण प्रसार हा मार्ग स्वीकारून समाजातील गोरगरिबांना शिक्षण देण्याचा संकल्प कै. गोपाळ नारायण अक्षीकर यांनी केला व विरळ वस्ती असलेल्या कामगार कष्टकरी मंडळीच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून सन १८८९ मध्ये दादरला प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु केल्या. आज या घटनेला १३३ वर्ष उलटून गेली. त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आज मोठ्या वृक्षात रूपांतर झाले आहे. जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट असे संस्थेला दिलेले समर्पक नाव संस्थेचे सध्याचे संचालक मंडळ यथार्थ पुढे नेत आहे.
सन १८८६-८७ च्या सुमारास दादरला शाळा काढायच स्वप्न उराशी बाळगून अलिबागहून मुंबईस बोटीने एक व्यक्ती, मध्यमवर्गीय तरुण व्यक्ती आली. ती व्यक्ती म्हणजे गोपाळ नारायण अक्षीकर. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अक्षी या गावी २५ सप्टेंबर १८६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यापुढील शिक्षण पुणे येथे झाले. लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर यांसारख्या स्वतंत्र व उदात्त विचारांच्या ध्येयवादी शिक्षकांच्या त्यागी जीवनाचा थोर संस्कार त्यांच्या मनावर पुण्यात प्रकर्षाने झाला. शिक्षणात स्वावलंबन हा उदात्त हेतू समोर ठेवून त्यांनी १८८९ साली दादर येथे शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू केले. २ जून १८८९ रोजी दादर येथे मराठी शाळा व दादर इंग्लिश स्कूल, त्यानंतर १८९० मध्ये कल्याणला इंग्लिश स्कूल, १८९२ मध्ये इंग्लिश स्कूल, ठाणे या शाळा त्यांनी सुरु केल्या. या सुरु केलेल्या शाळांवर योग्य नियंत्रण व व्यवस्थापन असावे म्हणून संस्था स्थापन करणे त्यांना आवश्यक वाटले. म्हणूनच त्यांनी २४ एप्रिल १८९२ रोजी “जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट” या संस्थेची स्थापना केली. त्यापूर्वी एक प्रारूप घटना तयार करून ती व्यवस्थित तपासून तिला अंतिम स्वरूप देणे महत्वाचे होते. घटना अस्तित्वात आल्याने संस्थेला कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले व संस्था ही कुणाचीही खासगी मालमत्ता नाही वा पश्चात् कुणास वारस म्हणूनही नियुक्ती करू नये असे स्पष्ट करण्यात आले. सन १८८९ ते १९१७ अशी एकूण २८ वर्षे त्यांनी शैक्षणिक कार्यासाठी खर्च केली. त्यांनी दादरसारख्या निर्जन मागासलेल्या भागात शैक्षणिक क्रांती घडवून आणली. पुढे शाळा काढतानाही ती बहुजन समाजातील अडल्या नडल्या गरीब विद्यार्थ्यांसाठीच काढायची हा निर्णय पक्का झाला. त्यावरुन त्यांची सामाजिक जाणीव किती तीव्र होती याची कल्पना येते. सर लेस्ली विल्सन या मुंबई प्रांताच्या गव्हर्नरने अक्षीकरांचे वर्णन "Father of Mass Education in the North of Bombay" (उत्तर मुंबईतील बहुजन समाजाच्या शिक्षणाचे जनक) असे यथोचितरित्या केले. संस्था ही आपल्या कौटुंबिक जीवनाचा एक भाग आहे असे मानून कुटुंबाकरिता सुद्धा कोणी करणार नाही इतके त्यांनी संस्थेसाठी कष्ट केले. केवळ एक व्यक्ती सर्व आर्थिक बळ एकटयाने उभे करण्याच्या हमीवर संस्था सुरु करते, पुन्हा ती हमी केवळ पहिली शाळा काढतानाच त्यांनी दिली होती असे नाही, तर संख्या स्थापन झाल्यावरही संस्थेच्या कुठल्याही शाळेस लागणारा निधी ते स्वतःच्या जमिनी विकुन उभा करून देत होते, हे अलौकिक औदार्य त्यांच्यापाशी होते. त्यांच्या वाट्याला वडिलोपार्जित इस्टेटीचा जो हिस्सा आला त्याचा उपयोग त्यांनी वेळोवेळी शिक्षकांचे पगार भागविण्यासाठी व संस्थेच्या कार्यात येणारी तूट भरुन काढण्याकरिता केला. आर्थिक जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना आपल्या पदरचे जवळळजवळ २९०००/- रु खर्च करावे लागले. त्या काळाचा विचार करता ही रक्कम प्रचंड मोठी, आताच्या काही कोटी रुपयांएवढी होती. तरीही त्यांनी एवढी मोठी रक्कम आपल्या ध्येयाच्या परिपूर्णतेसाठी नि:स्वार्थीपणे मोठ्या आनंदाने खर्च केली. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या कुटुंबाच्या सुखाची, स्थैर्याची कधीच काळजी केली नाही किंबहुना एकद नव्हे तर दोनदा त्यांच्या पत्नी यशोदाबाईंच्या अंगावरचे दागिने त्यांना संस्थेच्या कामासाठी विकावे लागले. किती हा त्याग! साधी राहणी, दयाशील वृत्ती, संभाषण कुशलता या गुणांमुळे सर्वांना प्रिय होते. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य सतत सर्वांना प्रेरणा देणारे आहे. आज संस्थेच्या एकूण ४५ शाळा कार्यरत आहेत. जो पर्यंत संस्था आहे तोपर्यंत त्यांची स्मृती कोणाच्याही मनातून जाणार नाही. कै. अक्षीकरांसारखे त्यागी, निष्ठावान माणसे त्यांच्या कार्याने अमर होतात.
१९३२ च्या सुमारास श्री यु.पी.वैद्य यांच्या नियुक्तीने पहिली ते तिसरी च्या वर्गांना सुरुवात करुन जून १९३५ पासून ज.ए. इ. दादर या शैक्षणिक संस्थेच्या देखरेखीखाली श्री कृ. ह. नित्सुरे यांच्या अध्यापनाने इयत्ता चौथी सुरू झाली. ६ फेब्रू.१९३७ रोजी ही शाळा एक स्वतंत्र इंग्रजी शाळा सुरु करुन दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट या ५० वर्षे अव्याहतपणे आणि उत्तम शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्थेस चालविण्याकरिता विनंती करण्यात केली व १९४१सालामध्ये भारतरत्न महर्षि धोंडो केशव कर्वे ह्यांच्या हस्ते शाळेचा कोनशीला समारंभ झाला. नंतर कै. अनंत सखाराम जोशी यांनी त्यांचे वडील कै. बाबासाहेब जोशी यांच्या स्मरणार्थ शाळागृह बांधून देण्याच्या त्यांच्या संकल्पास अनुसरून प्रयत्न केले आणि त्यातूनच 'स.वा.जोशी' उदयास आली.
पोषक वातावरणात मातृभाषेवर भर देत संस्कृती जोपासणारे, कृतीयुक्त व्यवसायाभिमुख शिक्षणासोबत सशक्त क्रीडानिपुण अष्टपैलू देशाभिमानी व्यक्तिमत्वाचे विद्यार्थी घडवणे.
प्रसन्न व आनंदी वातावरणाला पोषक अशी सुसज्ज इमारत.
शाळेची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरणे हे काळानुसार क्रमप्राप्त आहे. त्यासाठीच शाळेचा भौतिक व शैक्षणिक सोयी सुविधांनी विकास करणे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध भाषांमधून शिक्षण देणे, व्यावसायिक कौशल्याचा विकास करणे व स्पर्धा परीक्षेसाठी तज्ञांचे मार्गदर्शन देणे
शारीरिक विकास साधण्यासाठी क्रीडा व कला अकॅडमी व मुलींसाठी N.C.C व क्रिकेट सुरू करणे.आधुनिक अद्ययावत व्यायाम शाळा सुरू करणे.
शिक्षक ,पालक व विद्यार्थी यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी शाळेतच विद्यार्थी व पालक समुपदेशन केंद्र सुरू करणे.
'ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये' असा आपल्याकडे एक संकेत आहे पण तरीही गंगे इतकेच गंगोत्रीला ही तेवढेच महत्त्व आहे. याच धर्तीवर डोंबिवलीतील आज कित्येक विद्यालये व महाविद्यालये असली व त्याबळावर पुण्यानंतर डोंबिवली एक शैक्षणिक हब म्हणून उदयास येत असली तरी या गंगेची गंगोत्री सन 1937 मध्ये स्थापन झालेले स. वा. जोशी विद्यालय आहे हे विसरून चालणार नाही. डोंबिवलीच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात गेली 85 वर्षे सातत्याने योगदान देणाऱ्या स. वा. जोशी विद्यालयाचे कर्तुत्व लक्षणीय आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केवळ डोंबिवलीतच नव्हे तर महाराष्ट्रात, भारतात व परदेशातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. ख्यातनाम साहित्यिक कै. श. ना नवरे, मा. ना. नकुलजी पाटील, मा. ना. श्री. जगन्नाथ पाटील यासारखे राजकारण धुरंधर, ज्येष्ठ पत्रकार व लेखक श्री. सुधीर जोगळेकर, सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार, विज्ञान लेखक श्रीराम शिधये, अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक, कवी साहित्यिक प्रवीण दवणे, लेखक, दिग्दर्शक रंगकर्मी फिजिओथेरपिस्ट डॉ. संजय रणदिवे, ख्यातनाम 'जादूगार शैलेंद्र' गोपुजकर, ज्येष्ठ गायिका संगीतशास्त्राच्या गाढ्या अभ्यासक डॉ. मृदुला दाढे जोशी, शास्त्रज्ञ शशिकांत दामले, अनेक नामवंत डॉक्टर, सीए, बांधकाम व्यवसायिक, संगणक तज्ञ, सध्याच्या भारतीय क्रिकेट संघातील दर्जेदार फलंदाज अजिंक्य रहाणे, छत्रपती पुरस्कार विजेती बास्केटबॉलपटू शिल्पा कापरेकर डांगे ही काही व्यक्तिमत्वे वानगीदाखल! शिक्षणक्षेत्रात काही वेगळे करण्याच्या हेतूने टिळक आगरकरांपासून प्रेरणा घेऊन सन 1892 मध्ये कै. गो. ना. अक्षीकर नावाच्या द्रष्ट्याने दादर मध्ये जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट व छबिलदास शाळेचा पाया घातला. दादर, कुर्ला, उरण, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी व डुंगेवडघर येथील विद्यालये हे त्याचेच विस्तारित स्वरूप! व्यवस्थापनात शिक्षक, निवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व समाजातील अन्य तज्ञ व अनुभवी व्यक्तींचा समावेश असणारी ही महाराष्ट्रातील एक जुनी व वैशिष्ट्यपूर्ण संस्था ! शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या नवनवीन संकल्पना आत्मसात करणारी ही संस्था आज परिवर्तनाच्या एका उंबरठ्यावर उभी आहे. शाळेचे संगणकीकरण, ई-लर्निंग पद्धती, शिक्षकांचे सातत्याने प्रशिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शिक्षणास अनुकूल अशा नवीन पद्धतीच्या इमारती, क्रीडा कौशल्यांचा विकास, अशा अनेक आघाड्यांवर संस्था सध्या काम करत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या झंझावातात आज ज्या मराठी माध्यमांच्या शाळा केवळ टिकूनच आहेत असे नव्हे तर प्रगतिपथावर आहे त्यापैकी एक म्हणजे डोंबिवलीचे स. वा. जोशी विद्यालय ! समर्पित भावनेने विद्यादान करणारे शिक्षक, स्नेहाची पखरण करणारा कर्मचारीवृंद, आखीव-रेखीव मैदाने व सजग व्यवस्थापन ही या शाळेची अगदी सुरुवातीपासूनची वैशिष्ट्ये व ती शाळेने आजही जपली आहेत व म्हणूनच डोंबिवलीचा इतिहास भूगोल व नागरिक शास्त्र स. वा. जोशी विद्यालयाच्या उल्लेखाविना कायमच अपूर्ण राहील. डोंबिवली व परिसरातील शिक्षणक्षेत्रातील शाळांच्या मांदियाळीत अग्रपंक्तीत विराजमान होणाऱ्या या डोंबिवलीच्या प्रथम शाळेची आपल्या सर्वांच्या सहकार्याने व आशीर्वादाने उत्तरोत्तर प्रगती होईल याची खात्री आहे.
'क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे.' या आपल्या संस्थेच्या ब्रीद वाक्याचे आचरण करत स.वा.जोशी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका या नात्याने आपल्यासमोर शाळेची वेबसाईट सादर करताना खूप अभिमान वाटत आहे. स.वा.जोशी शाळेची परंपरा जपत, विज्ञानाची कास धरत, 'डिजिटल इंडिया' घडविण्यात स.वा.जोशी विद्यालय नेहमीच प्रयत्नशील राहील. स.वा जोशी शाळेने गेले ८५ वर्षे अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य उत्कृष्टरित्या पार पाडले आहे. २१व्या शतकात Online Presence असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच आज आपण स.वा.जोशी शाळेची वेबसाईट बनविली आहे. शाळेची प्रवेशप्रक्रिया, अभ्यासक्रम, माजी विद्यार्थी तसेच शालेय उपक्रम इत्यादींची माहिती विद्यार्थ्यांना व पालकांना फक्त एका क्लिकवर घरबसल्या बघणे शक्य होईल. स.वा.जोशी शाळेने आजपर्यंत शास्त्रज्ञ, साहित्यिक, डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, अर्थतज्ञ, कलावंत राजकारणी आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू घडविले आहेत. अशा सर्व भारतात व जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या आठवणी ताज्या करून देण्यात ही वेबसाईट खूप उपयोगी पडेल.
'भारत महासत्ता व्हावा अशी आपणां सर्वांची इच्छा असते परंतु तें फलद्रूप होण्याकरिता जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आपणाला फार मोठी झेप घ्यावी लागणार आहे. ही झेप घेण्याकरिता पंखांमध्ये बळ आणण्याची महत्त्वाची भूमिका 'प्राथमिक शिक्षण'बजावते. किंबहुना वैयक्तिक व सामाजिक मूल्यांचा पाया याच प्राथमिक वर्षात घातला जातो. हा पाया मातृभाषेतील शिक्षणामुळे अधिक मजबूत होतो. मातृभाषेतील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढते विषयाची समज येते व सृजनशीलतेलाअधिक वाव मिळतो. महत्त्वाचे म्हणजे मातृभाषेला एक भावनिक आधार असतो. आपली आई,आजी, आजोबा ,बहिण-भावंडे जी भाषा बोलतात त्या भाषेत शिक्षण घेतल्यास त्याला एक भावनिक लिंपण लागते व ते मनात शिरून सहजपणेझिरपते. इंग्रजी भाषा ही आज जागतिक ज्ञानभाषा म्हणून ओळखली जाते.तीउत्तम अवगत असणे, यशस्वी आयुष्याच्या दृष्टीने अत्यावश्यक म्हणून काळाची पावले ओळखत शाळेने सेमी इंग्रजी शिक्षणाची सोय केली. बदलता काळ, बदलते राहणीमान, सरकारी धोरण, संस्कृती मूल्ये निष्ठा यांचे बदलते सामाजिकीकरण या पार्श्वभूमीवर आकाराला येणारे हे 'संगणक' युग पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करून उभे राहिलेले हे आव्हान शाळेने पेलले.तनमनधन ओतून शिकवणारे शिक्षक, प्रतिष्ठित प्रशिक्षित पदवीधर व पदवीत्तोर शिक्षण घेऊन सतत आपले ज्ञान प्रशिक्षणातून अद्ययावत ठेवून विद्यार्थी व पालकांशी समरस होऊन शाळेच्या गुणवत्तेचा व सर्वांगिण विकासाचा आलेख उंचावत आहेत पाश्चात्त्य देशांमध्ये माध्यमिक वा उच्च शिक्षणापेक्षा प्राथमिक शिक्षणाकडे अधिक काटेकोरपणे पाहिले जाते. आपणही आपली मानसिकता बदलून प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी पालक, शिक्षक, प्रसिद्धीमाध्यमे, सर्व समाज घटक एकत्र येऊन व्यापक दृष्टिकोनातून सकस, सुजाण, सुसंस्कारित भारतीय पिढी घडविण्याचा संकल्प करूया !
President
अध्यक्ष
प्रसिद्ध बालरोगतज्ञ व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४० चे माजी डिस्ट्रिक्ट गवर्नर
प्रसिद्ध बालरोगतज्ञ व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४० चे माजी डिस्ट्रिक्ट गवर्नर
Vice President
उपाध्यक्ष
भिवंडीचे सुप्रसिद्ध सोन्या-चांदीचे सराफ
भिवंडीचे सुप्रसिद्ध सोन्या-चांदीचे सराफ
Vice President
उपाध्यक्ष
ज.ए.इ घ्या सुभेदार वाडा शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि प्रख्यात वास्तु विशारद.
ज.ए.इ घ्या सुभेदार वाडा शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि प्रख्यात वास्तु विशारद.
Vice President
उपाध्यक्ष
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे वर्ष २०२३-२४ चे नियोजित डिस्ट्रिक्ट गवर्नर
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे वर्ष २०२३-२४ चे नियोजित डिस्ट्रिक्ट गवर्नर
Chairman
कार्याध्यक्ष
सदस्य: संजिवनी सहकारी पतसंस्था व सरस्वती विद्यामंदिर उपाध्यक्ष - विद्यार्थी सहायता संघ
सदस्य: संजिवनी सहकारी पतसंस्था व सरस्वती विद्यामंदिर उपाध्यक्ष - विद्यार्थी सहायता संघ
Vice Chairman
उपकार्याध्यक्ष
विद्यमान संचालक मंडळ सदस्य व उपकार्याध्यक्ष ज.ए.इ. दादर.
चित्रलेखा फोटो स्टुडिओचे सर्वेसर्वा.
विद्यमान संचालक मंडळ सदस्य व उपकार्याध्यक्ष ज.ए.इ. दादर.
चित्रलेखा फोटो स्टुडिओचे सर्वेसर्वा.
Treasurer
कोषाध्यक्ष
निवृत्त उपप्राचार्य मो.ह. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ठाणे (३६ वर्षे सेवा) सध्या सेवानिवृत्त.
निवृत्त उपप्राचार्य मो.ह. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ठाणे (३६ वर्षे सेवा) सध्या सेवानिवृत्त.
Secretary
कार्यवाह
स. वा. जोशी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक
स. वा. जोशी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक
Assistant Secretary
उपकार्यवाह
हायस्कूल, कल्याण शाळेतील वरिष्ठ शिक्षक
हायस्कूल, कल्याण शाळेतील वरिष्ठ शिक्षक
Member
संचालक मंडळ सदस्य
संस्थेच्या छ.ल. बॉईज हायस्कूलचे माजी विद्यार्थी,
दादर मध्ये मिठाई व तत्सम खाद्य पदार्थाचे दुकान (१९५८ ते २००६)
संस्थेच्या छ.ल. बॉईज हायस्कूलचे माजी विद्यार्थी,
दादर मध्ये मिठाई व तत्सम खाद्य पदार्थाचे दुकान (१९५८ ते २००६)
Member
संचालक मंडळ सदस्य
सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक, क्राइम ब्रांच, मुंबई
सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक, क्राइम ब्रांच, मुंबई
Member
संचालक मंडळ सदस्य
ज.ए.इ.चे प.रा.विद्यालय, भिवंडी या शाळेचे माजी विद्यार्थी आहे व भिवंडीतील प्रसिद्ध उद्योजक
ज.ए.इ.चे प.रा.विद्यालय, भिवंडी या शाळेचे माजी विद्यार्थी आहे व भिवंडीतील प्रसिद्ध उद्योजक
Member
संचालक मंडळ सदस्य
मध्य रेल्वे ट्रेन एक्झामिनर म्हणून कामकाज व सध्या सेवानिवृत्त आहे.
Member
संचालक मंडळ सदस्य
ज.ए.इ. चे एन.आय. हायस्कूल, उरण या शाळेचे माजी विद्यार्थी. उरण येथील प्रसिध्द उद्योजक.लायन्स इंटरनेशनल क्लबचे डिस्ट्रिक चेअरमन.
ज.ए.इ. चे एन.आय. हायस्कूल, उरण या शाळेचे माजी विद्यार्थी. उरण येथील प्रसिध्द उद्योजक.लायन्स इंटरनेशनल क्लबचे डिस्ट्रिक चेअरमन.
Member
संचालक मंडळ सदस्य
हायस्कूल, कल्याण शाळेतील माजी विद्यार्थी
१.. सध्या आय.एस.ओ सिस्टम्स ऑडिटर्स व कन्सल्टंट.
२..कोटक महिंद्रा या विमा कंपनीचे सल्लागार.
हायस्कूल, कल्याण शाळेतील माजी विद्यार्थी
१.. सध्या आय.एस.ओ सिस्टम्स ऑडिटर्स व कन्सल्टंट.
२..कोटक महिंद्रा या विमा कंपनीचे सल्लागार.
Member
संचालक मंडळ सदस्य
संचालक-त्रिमूर्ती केटरर्स, डोंबिवली (पूर्व).
संचालक-त्रिमूर्ती केटरर्स, डोंबिवली (पूर्व).
Member
संचालक मंडळ सदस्य
प. रा. विद्यालय, भिवंडीचे माजी विद्यार्थी व टेक्स्टाईल्स वर्क शॉप बांधकाम व्यवसाय
प. रा. विद्यालय, भिवंडीचे माजी विद्यार्थी व टेक्स्टाईल्स वर्क शॉप बांधकाम व्यवसाय
Member
संचालक मंडळ सदस्य
संस्थेच्या प.रा. विद्यालय, भिवंडी येथे सहाय्यक शिक्षक ते उपमुख्याध्यापक पदावर कार्यरत होते .सध्या सेवानिवृत्त आहेत.
संस्थेच्या प.रा. विद्यालय, भिवंडी येथे सहाय्यक शिक्षक ते उपमुख्याध्यापक पदावर कार्यरत होते .सध्या सेवानिवृत्त आहेत.
Member
संचालक मंडळ सदस्य
ज.ए.इ.चे स.वा.जोशी विद्यालय व कनिष्ठ महविद्यालय डोंबिवली येथे गेल्या २३ वर्षापासून कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे.
ज.ए.इ.चे स.वा.जोशी विद्यालय व कनिष्ठ महविद्यालय डोंबिवली येथे गेल्या २३ वर्षापासून कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे.
Member
संचालक मंडळ सदस्य
ज.ए.इ.चे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सुभेदारवाडा कल्याण येथे सहा.शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
ज.ए.इ.चे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सुभेदारवाडा कल्याण येथे सहा.शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
Member
संचालक मंडळ सदस्य
गेल्या २२ वर्षापासून संस्थेच्या मो. ह. विद्यालय ठाणे येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत इंग्रजी, संस्कृत या विषयांचे अध्यापन.
गेल्या २२ वर्षापासून संस्थेच्या मो. ह. विद्यालय ठाणे येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत इंग्रजी, संस्कृत या विषयांचे अध्यापन.
Member
संचालक मंडळ सदस्य
ज.ए.इ.चे प.रा. विद्यालय, भिवंडी येथे सहा. शिक्षक म्हणून कार्यरत
ज.ए.इ.चे प.रा. विद्यालय, भिवंडी येथे सहा. शिक्षक म्हणून कार्यरत
Member
संचालक मंडळ सदस्य
सहा.शिक्षक म्हणून संस्थेच्या स. वा. जोशी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, डोंबिवली पूर्व येथे कार्यरत.
सहा.शिक्षक म्हणून संस्थेच्या स. वा. जोशी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, डोंबिवली पूर्व येथे कार्यरत.
Member
संचालक मंडळ सदस्य
ज.ए.इ. चे डुंगे वडघर शाळेचे मुख्याध्यापक
ज.ए.इ. चे डुंगे वडघर शाळेचे मुख्याध्यापक
Auditor
लेखापाल
जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे लेखापाल
जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे लेखापाल